महाराष्ट्राचा
भूगोल
महाराष्ट्र राज्य:
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेचा वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभागहोते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
1. कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
2. पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
3. नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
4. औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5. अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
6. नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
4. पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
6. पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
1. वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
2. उत्तरेस : मध्यप्रदेश.
3. पूर्वेस : छत्तीसगड.
4. आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
5. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
1. गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुले
2. दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
3. मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
4. छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
5. आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
6. गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्रचे भारतातील स्थान :
भारतातील 29 राज्यांपैकी एक.
भारताच्या मध्यवर्ती भागात .
महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .
1. विस्तार
अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्येप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
1. 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
2. 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
3. 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
4. 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
5. 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
6.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)
महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती
पठारांची निर्मिती :
महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.
70 दशलक्ष वर्षापूर्वी - भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले.
या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.
भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे दोन प्रकारचे खडक आढळतात.
महाराष्ट्र पठारावरील खोरे (उत्तरेकडून दक्षिणेकडील) :
1. तापी-पूर्णा खोरे
2. गोदावरी खोरे
3. प्रणहिता खोरे
4. भीमा खोरे
5. कृष्णा खोरे
भूगर्भ रचना :
अ. आर्कियन खडक :
हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
ब. धारवाड खडक :
या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
क. कडप्पा श्रेणींचा खडक :
महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.
ड. विंध्ययन खडक :
विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
इ.गोंडवना खडक :
अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.
त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :
महाराष्ट्राच्या
प्राकृतिक
रचनेचे तीन
विभाग
1. कोकण
किनारपट्टी
2. सह्याद्रि
पर्वत /
पश्चिम घाट
3. महाराष्ट्र
पठार / दख्खन
पठारी
1. कोकण किनारपट्टी :
· स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
·
· विस्तार: उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
·
· लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
·
· क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.
·
·
2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :
· स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
·
· यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
·
· पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :
· स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
· लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.
· ऊंची: 450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
· महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्यांनी व्यापले आहे.
महाराष्ट्रातील काही बेटे
बेटांचे नाव |
जिल्हा |
कुलाबा |
रायगड |
मढ |
मुंबई |
साष्टी |
मुंबई |
घारापुरी |
रायगड |
जंजिरा |
रायगड |
उंदेरी, खांदेरी |
रायगड |
भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे
· छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : मुंबई
· इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी मुंबई
· नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोलकत्ता
· के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : चेन्नई
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ : नागपूर
· राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : हैदराबाद
· गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोहाटी
· दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोवा
· सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : अहमदाबाद
· श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ : श्रीनगर
· बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : बंगळूर
· मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : मंगळूर
· कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ : कलिकत
· कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची
· त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूअनंतपुरम
· देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : इंदौर
· श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : अमृतसर
· जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : जयपूर
· वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : पोर्टब्लेअर
· कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोईमतूर
· तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूचिरापल्ली
· चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ : लखनौ
· लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ : वाराणशी
भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे
· बंदरे - राज्य
· कांडला : गुजरात
· मुंबई : महाराष्ट्र
· न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र
· मार्मागोवा : गोवा
· कोचीन : केरळ
· तुतीकोरीन : तमिळनाडू
· चेन्नई : तामीळनाडू
· विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश
· पॅरादीप : ओडिसा
· न्यू मंगलोर : कर्नाटक
· एन्नोर : आंध्रप्रदेश
· कोलकत्ता : पश्चिम बंगाल
· हल्दिया : पश्चिम बंगाल
भारतातील जंगलाविषयी माहिती
· भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.
· भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.
भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये :
आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य -
· भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.
क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य -
· क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.
सर्वात कमी जंगल नसलेले राज्य -
· हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.
भारतातील प्रमुख जिवारण्ये :
· निलगिरी - तामीळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांमिळून
· नंदादेवी - उत्तराखंड
· मानस - आसाम
· सुंदरबन - पश्चिम बंगाल
· मन्यार खाडी - तामीळनाडू
· पंचमढी - मध्यप्रदेश
· कच्छ - गुजरात
· ग्रेट निकोबार - अंदमान व निकोबर
फळे व व्यापारी करीता प्रसिद्ध राज्ये
· चहा - आसाम (प्रथम), पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू
· कॉफी - कर्नाटक (प्रथम), केरळ
· ऊस - उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा
· कापूस - गुजरात (प्रथम), पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान
· ताग - पश्चिम बंगाल (प्रथम), आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा
· तंबाखू - तेलंगणा (प्रथम), तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र
· रबर - केरळ (प्रथम), तामिळनाडू
कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती
· हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादनात वाढ
· धवल क्रांती - दुधाच्या उत्पादनात वाढ
· श्वेताक्रांती - रेशीम उत्पादनात वाढ
· नीलक्रांती - मत्स्यत्पादनात वाढ
· पीतक्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ
· लाल क्रांती - मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
· तपकिरी क्रांती - कोकोचे उत्पादन वाढवणे
· गोलक्रांती - आलू उत्पादनात वाढ
· सुवर्ण क्रांती - मधाचे उत्पादन
· रजत धागा क्रांती - अंडे उत्पादन
· गुलाबी क्रांती - कांदा उत्पादन
भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे
· अन्नागुडई - 2695 - केरळ
· दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू
· गुरुशिखर - 1722 - राजस्थान
· कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र
· महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा
· मलयगिरी - 1187 - ओडिसा
· पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी.
· पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.
भौगोलिक उपनावे व टोपणनावे
· ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
· उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
· काळे खंड - आफ्रिका
· कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
· गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
· चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
· गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
· जगाचे छप्पर - पामिराचे पठार
· दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
· नाईलची देणगी - इजिप्त
· पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
· पाचुचे बेट - श्रीलंका
· पूर्वेकडील ब्रिटन - जपान
· भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
· मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
· युरोपचे क्रीडांगण - स्वित्झलँड
· गव्हाचे कोठार - युक्रेन
· युरोपचे कॉकपीट - बेल्जियम
· लवंगाचे बेट - मादागास्कर
· सात टेकड्यांचे शहर - रोम
· हजार सरोवरांची भूमी - फिनलँड
· व्हाईट सिटी - बेलग्रेड
· पांढर्या हत्तीचा देश - सयाम
· साखरेचे कोठार - क्यूबा
· पूर्वेकडील ब्रिटन - जपान
जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे
· जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर
· महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)
· सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.
· सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.
· सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया
· सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)
· सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)
· सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.
· सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.
· सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे
· सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)
· सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची
· सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.
· सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)
· सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.
· सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.
· सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.
· सर्वात मोठे खार्या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.
· सर्वात गोड्या खार्या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)
· सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)
· सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.
· सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.
· सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)
· सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.
· सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.
· सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)
· सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी
· सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)
· सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)
· सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.
· सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)
· सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)
· सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.
· सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क
· सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)
· सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.
· सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.
· सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.
· सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.
· सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.
· सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)
· सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)
· सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)
· सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.
· सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.
· सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे
· सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी
· सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर
· सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी
· सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन
· सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक
· सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क
· सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन
· सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.
· सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)
· सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)
· सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)
· सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी.
· सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी.
· सर्वात मोठा ग्रह - गुरु
· पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह - शुक्र
जगातील प्राणिजन्य पदार्थ उत्पादक देश
प्राणिजन्य पदार्थ |
उत्पादक देश |
मत्स्योत्पादन |
चीन, पेरु, जपान, अमेरिका, रशिया, नॉर्वे. |
दुग्धोउत्पादन |
भारत, रशिया, अमेरिका, फ्रांस, बाल्टिक राष्ट्रे. |
लोकर |
ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड |
रेशीम |
जपान, चीन, कोरिया, भारत, तुर्कस्थान |
गुरे(संख्या) |
भारत, अमेरिका, रशिया. |
डुकरे(संख्या) |
चीन, रशिया, अमेरिका |
जगातील विविध वस्तूचे प्रमुख उत्पादक देश
वस्तूचे नाव |
प्रमुख उत्पादक देश |
तांदूळ |
चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार. |
गहू |
चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया. |
मका |
अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना. |
कापूस |
चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल. |
ताग |
बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान |
कॉफी |
ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत. |
चहा |
भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया. |
ज्वारी-बाजारी |
भारत, चीन, रशिया. |
बार्ली |
रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश. |
रबर |
मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका. |
ऊस |
भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको. |
तंबाखू |
अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त |
कोको |
घाना, ब्राझिल, नायजेरिया. |
प्रमुख नद्या व त्यांची लांबी
नदीचे नाव |
प्रदेश |
लांबी |
नाईल |
इजिप्त (उ.पू. आफ्रिका) |
6671 कि.मी. |
अॅमेझोन |
ब्राझिल (दक्षिण अमेरिका) |
6280 कि.मी. |
चंग जियांग (यांगत्से) |
चीन (आशिया) |
5494 कि.मी. |
मिसिसिपी-मिसूरी |
उ. अमेरिका |
6260 कि.मी. |
झैरे (कोंगो) |
झाझरे (मध्य आफ्रिका) |
4800 कि.मी. |
हुवांग-हे (व्हंग हो) |
चीन (आशिया) |
4672 कि.मी. |
आमुर |
सायबेरीया (मध्य आशिया) |
4550 कि.मी. |
लिना |
रशिया |
4800 कि.मी. |
मॅकेंझी |
कॅनडा |
4270 कि.मी |
मेकोंग |
चीन (आग्नेय आशिया) |
4160 कि.मी. |
नायजर |
नायजेरिया (प.आफ्रिका) |
4170 कि.मी. |
येनीसी |
सायबेरिया (रशिया) |
4670 कि.मी. |
मुरे-डार्लिंग |
ऑस्ट्रेलिया |
3750 कि.मी. |
व्होल्गा |
रशिया |
3700 कि.मी. |
सिंधु |
भारत-पाकिस्तान |
3180 कि.मी. |
डॅन्यूब |
हंगेरी-झेकोस्लाविया (युरोप) |
2860 कि.मी. |
पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार
1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.
2. भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.
3. खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.
4. बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.
5. समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.
6. संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.
7. आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.
8. खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.
9. समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्या खार्या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र
10. उपसागर - खार्या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर
पृथ्वीसंबंधीची माहिती
· पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी
· पृथ्वीचा आकार - जिऑइड
· पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.
· पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी.
· पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी.
· पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी.
· पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी.
· पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी.
· पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी.
· पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी.
· पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी.
· पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला.
चंद्रासंबंधीची माहिती
· चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
· चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.
· चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.
· चंद्रास सूर्यापासून मिळणार्या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.
· चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो. चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.
· चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.
· चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.
· चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.
· पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.
· अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.
सूर्यासंबधीची माहिती
· सूर्याचे पृथ्वीपासून अंतर - 14,95,00,000 किलोमीटर
· सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ - 8 मिनिटे
· सूर्याचा व्यास - 13,91,980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट
· सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति - पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.
· सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी - 26.8 दिवस
· सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान - 60000 से.
· सूर्याच्या आंतरभागातील तापमान - 30,0000 से. पेक्षाही अधिक
· सूर्यकुलातील एकूण ग्रह - आठ
सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती
1. ग्रहाचे नाव - बूध
· सूर्यापासुन चे अंतर - 5.79
· परिवलन काळ - 59
· परिभ्रमन काळ - 88 दिवस
· इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.
2. ग्रहाचे नाव - शुक्र
· सूर्यापासुन चे अंतर - 10.82
· परिवलन काळ - 243 दिवस
· परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
· इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
3. ग्रहाचे नाव - पृथ्वी
· सूर्यापासुन चे अंतर - 14.96
· परिवलन काळ - 23.56 तास
· परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
· इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
4. ग्रहाचे नाव - मंगळ
· सूर्यापासुन चे अंतर - 22.9
· परिवलन काळ - 24.37 तास
· परिभ्रमन काळ - 687
· इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.
5. ग्रहाचे नाव - गुरु
· सूर्यापासुन चे अंतर - 77.86
· परिवलन काळ - 9.50 तास
· परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.
6. ग्रहाचे नाव - शनि
· सूर्यापासुन चे अंतर - 142.6
· परिवलन काळ - 10.14 तास
· परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
· इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.
7. ग्रहाचे नाव - युरेनस
· सूर्यापासुन चे अंतर - 268.8
· परिवलन काळ - 16.10 तास
· परिभ्रमन काळ - 84 वर्षे
· इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
8. ग्रहाचे नाव - नेपच्यून
· सूर्यापासुन चे अंतर - 449.8
· परिवलन काळ - 16 तास
· परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
· इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
महाराष्ट्राची प्रशासकीय रचना
राज्याचे विधीमंडळ -
· व्दिगृही (विधानसभा व विधान परिषद)
· विधान सभेची सभासद संख्या - 288+1
· विधान परिषदेची सभासद संख्या - 78
· एकूण जिल्हे - 36
· उपविभाग - 182
· एकूण तालुके - 355
· एकूण महसुली गावे - 43,137
· जिल्हा परिषदा - 34
· पंचायत समित्या - 351
· ग्रामपंचायती - 27,873
· नगरपालिका - 226
· महानगरपालिका - 26 (नवी मुंबई, मुंबई, ठाणे, अकोला, नागपूर, चंद्रपूर, धुळे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, अमरावती, परभणी, जळगांव, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाडा, भिवंडी-निझामपूर, मालेगांव, मीरा-भाईदंर, वसई-विरार, अहमदनगर)
· कटकमंडळे - 7 पुणे, खडकी, देहुरोड(पुणे), औरंगाबाद, कामठी(नागपूर), भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक).
महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान -
1. राज्य - गुजरात
· स्थान - महाराष्ट्राच्या वायव्येस
· स्पर्श करणारे जिल्हे - पालघर, नाशिक व धुळे.
2. राज्य - मध्यप्रदेश
· स्थान - महाराष्ट्राच्या उत्तरेस
· स्पर्श करणारे जिल्हे - धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर व भंडारा.
3. राज्य - छत्तीसगढ
· स्थान - महाराष्ट्राच्या पूर्वेस
· स्पर्श करणारे जिल्हे - भंडारा व गडचिरोली.
4. राज्य - तेलंगणा
· स्थान - महाराष्ट्राच्या आग्येयस
· स्पर्श करणारे जिल्हे - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड.
5. राज्य - कर्नाटक
· स्थान - महाराष्ट्राच्या दक्षिणेस
· स्पर्श करणारे जिल्हे - नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्.
6. राज्य - गोवा
· स्थान - महाराष्ट्राच्या नैऋत्येस
· स्पर्श करणारे जिल्हे - सिंधुदुर्ग
महाराष्ट्राची मानचिन्हे
· महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
· उपराजधानी - नागपूर
· राज्य फळ - आंबा
· राज्य फूल - मोठा बोंडारा किंवा तामन
· राज्य पक्षी - हारावत
· राज्य प्राणी - शेकरू
· राज्य भाषा - मराठी
देशातील नदीकाठी वसलेली महत्वाची शहरे
1. झेलम - श्रीनगर
2. यमुना - आग्रा,दिल्ली
3. सतलज - लुधियाना
4. सिंधु - लेह
5. गंगा - वाराणसी
6. मुसी - हैद्राबाद
7. ब्रह्मपुत्रा - गुवाहाटी (गोहत्ती)
8. तापी - सुरत
9. गोदावरी - नांदेड, नाशिक
10. कृष्णा - विजयावाडा
11. साबरमती - अहमदाबाद
12. शरयू - अयोध्या
13. कावेरी - तंजावर
14. हुगळी - कोलकाता
15. गोमती - लखनऊ
महाराष्ट्रची कोकण किनारपट्टी :
स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.
विस्तार : उत्तरेस - दमानगंगा नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.
लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .
उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.
कोकणातील प्राकृतिक रचना :
· कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
· किनार्य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.
· कींनार्यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
· उतार पूर्व-पश्चिम दिशेस 'मंद' स्वरूपाचा आहे.
· या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली 'भुरुपे' आढळतात.
· उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.
· कोकणचे उपविभाग :
· 1.उत्तर कोकण - ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.
· हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.
· ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
· लोकसंख्येची घनता अधिक.
· नागरी लोकसंख्या जास्त.
· दक्षिण कोकण - रत्नागिरी, सिंधुदुर्ग
· हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
· ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
· लोकसंख्येची घनता कमी.
· पारंपरिक व्यवसाय.
· खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.
समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.
1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे 'खलाटी' होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.
या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.
2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश
म्हणजेच 'वलाटी' होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.
कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे
1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.
ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
मुंबई उपनगर : मालाड, माहीम
मुंबई : माहीम
रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग
सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल
2. पुळनी : समुद्र किनार्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्यावर तयार होणार्या वाळूच्या पट्टयाना 'पुळन' असे म्हणतात.
मुंबई उपनगर : जिहू बीच
मुंबई शहर
दादर, गिरगाव
रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर
सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा
रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन
3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्यावर 'वाळूचे दांडे' तयार होतात.
खरदांडा(रायगड)
4. बेटे : मुंबई : मुंबई बेट
रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)
अलिबाग : खांदेरी, उंदेरी
सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)
मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव
5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.
मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),
रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,
सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी
6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,
म्यंगेणीज = सिंधदुर्ग,
क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व
जिप्सम = रत्नागिरी
7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,
मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री
दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.
जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्यास समांतर. कारण, 'डोंगरांच्या रांगा'
8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व सागरी किल्ले
ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा
रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा
रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग
सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग
भारतगड, पधगड सजैकोत
No comments:
Post a Comment